रत्नागिरीत रविवारी गायक-वादकांचे संमेलन

0

◼️ तीन वर्षांनी एकत्र भेट; सांगितिक, वैचारिक मेजवानी

रत्नागिरी : विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने तयार झालेले कलाकार रसिकांच्या भेटीला सतत येत असतात; मात्र हे सारे कलाकार एकमेकांच्या परिचित असतातच असे नाही. रविवारी (ता. २६) गायक-वादक कलाकार संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील हेच कलाकार एकत्र येणार आहेत. या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावे, ओळखी व्हाव्यात, विचारांचे आदानप्रदान व्हावे, नवनवीन संकल्पना शेअर कराव्यात, सांगितिक, वैचारिक मैफिली रंगाव्यात या हेतूने सारेजण सम्मिलित होणार आहेत.

कोरोनाच्या सावटामुळे जवळजवळ तीन वर्षांनंतर सर्व सांगितिक कलाकार एकत्र येणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात रविवारी दिवसभर हे संमेलन रंगणार आहे. सकाळी ७ वा. नावनोंदणी होईल व ९ वा. दीपप्रज्वलनाने संमेलनाला आरंभ होईल. त्यानंतर प्रथम सत्रात शास्त्रीय व सुगम गायन तसेच वाद्यवादन मैफल रंगणार आहे.

स्नेहभोजनानंतरच्या दुसऱ्या सत्रात ‘संगीत साधना आणि ईश्वरप्राप्ती’ या विषयावर कीर्तनातून मुलाखत होईल. कलाकारांना मनोगत व्यक्त करण्याची संधीही यानंतर मिळणार आहे. नव्या-जुन्या कलाकारांचा परिचय, काही हटके गायन, नृत्याचे कलाविष्कार, फिशपॉन्ड याशिवाय उत्स्फूर्त प्रहसनांचे सादरीकरणही या वेळी होईल. प्रेमविवाह केलेल्या कलाकार पती-पत्नींच्या खास मुलाखती हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पसायदानानंतर स्नेहभोजनाने संमेलनाची सांगता होईल. गेला महिनाभर संध्या सुर्वे, श्वेता जोगळेकर, गणेश रानडे, विजय रानडे, उदय गोखले, हेरंब जोगळेकर आदी रत्नागिरीतील कालाकार मंडळी या संमेलनाचे नियोजन करत असून, कलाकारांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 25-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here