शिरगाव ग्रामपंचायतीमार्फत फवारणी मोहीम सुरु

0

रत्नागिरी : एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असतानाच आता ग्रामीण भागात देखील ग्रामपंचायतींमार्फत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्यात. त्याच पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीत फवारणी मोहीम हाती घेतली आहे. शनिवारी सकाळी बांधखिंड परिसरात ही फवारणी मोहीम हाती घेतली होती. या परिसरातील प्रत्येक गल्लीबोळात फवारणी करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच साक्षी कुमठेकर, ग्रा.प.सदस्य चित्रा दळी, सचिन सनगरे, शिवसेना उपविभाग प्रमुख जितेंद्र उर्फ बाबू नेरकर आदी उपस्थित होते. कोरोनाची भीती निर्माण झालेली असताना शिरगाव ग्रामपंचायतीने विशेष खबरदारी घेऊन ग्रामपंचायत हद्दीत सुरू केलेली मोहीमेमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून या काळात 15 दिवसातून एकदा अशी फवारणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here