गोरगरीब जनतेसाठी आरोग्य यंत्रणेला आणखी बळकट करण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे सरसावले आहेत. देशातला नावाजलेला उद्योग समूह असलेला बजाज ग्रुपही सरकारच्या मदतीला धावून आला आहे. बजाज ग्रुपनं आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी बजाज उद्योग समूह शक्य तितके प्रयत्न करणार आहे.
