लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व बँकांचे कामकाज चालू राहणार; अर्थ मंत्रालय

0

लॉकडाऊनच्या काळात देशातील बँकांच्या सर्व शाखातील कामकाज चालू राहील. यासंदर्भातील कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाचे सचिव देबशिष पांडा यांनी सांगितले आहे की, सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे आगामी काळात बँकांच्या शाखातील कामकाजही थांबविले जाणार असल्याच्या अफवा समाज माध्यमांमध्ये पसरल्या आहेत. मात्र बँकिंग सेवा अत्यावश्यक असल्यामुळे शाखातील कामकाज सुरळीत चालू राहील. मात्र कामकाजाचा कालावधी काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहक शाखांतून व्यवहार करण्याऐवजी एटीएम आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करावे, असे पांडा यांनी स्पष्ट केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:41 PM 27-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here