रेशनिंगचे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला रस्त्यात गाय आडवी आल्याने अपघात

0

रत्नागिरी : दापोलीत रेशनिंगचे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला नवानगर येथे शनिवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात ट्रकच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक यामध्ये बचावला.

कैलास सावंत हा चालक आपल्या ताब्यातील ट्रकमधून 21 टन धान्य घेऊन दापोलीच्या दिशेने चालला होता. नवानगर येथे रस्त्यावर गाय आडवी आल्याने तिला वाचवण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक गटारात कलंडला. यामध्ये टेम्पोचे समोरील भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:33 PM 27-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here