डी. जे. सामंत महाविद्यालय पाली येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

0

रत्नागिरी : डी. जे. सामंत वरिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाली येथे थोर समाजसुधारक, दलितांचे कैवारी आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा विभाग प्रमुख प्रा. सुदीप पवार उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात शाहू महाराजांचा इतिहास व त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे उपस्थित होत्या. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात महाराजांची संपूर्ण जीवनगाथा आणि त्यांचे कार्य व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि समान संधी केंद्र यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनोद भुवड यांनी केले. सूत्रसंचालन कु. सुश्मिता खोचाडे(SYBCOM) हिने तर आभार कु. आकांशा गावडे (SYBA) हिने केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:23 PM 27-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here