विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे

0

मुंबई : सध्या अवघ्या जगाचे लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आणि याचे कारण आहे एकनाथ शिंदे…

शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून सर्च केले जात आहे.

एकनाथ शिंदे हे नेमके कोण आहे? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे विकिपीडियावर एकनाथ शिंदे हे सध्या मोदी, बायडेन तसेच पुतीन पेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.

जगातील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया हा आता परवलीचा शब्द निर्माण झाला आहे. विकिपीडिया हा जगात सर्वात जास्त वापरला जाणारा विश्वकोश आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद हे गूगल नंतर विकिपीडियावर देखील दिसत आहेत. जो बायडन यांच्या बद्दलचा विकिपीडियाचा लेख हा 1,27,104 लोकांकडून वाचला गेला तर एकनाथ शिंदे यांचा लेख 3,35, 060 लोकांनी वाचला. विकिपीडियाच्या अभिषेक सूर्यवंशी यांनी या माहितीस दुजोरा दिला व एकनाथ शिंदे यांचे विकिपीडिया आर्टिकल सध्या राजकीय क्षेत्रात सर्वात जास्त वाचले जात आहे असे सांगितले.

विकिपीडिया ही साईट म्हणजे फ्री सोर्सच आहे. महाराष्ट्राच्या राजकाराणाला हदरवून सोडणारे एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जगभरातील नागरिक एकनाथ शिंदेंबाबत विकिपीडियावरून माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. विकिपीडियावर सध्या एकनाथ शिंदे हे अव्वल स्थानी आहे. एकनाथ शिंदेनंतर अनुक्रमे जो बायडन, पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमाक लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख 67,848 लोकांनी वाचला आहे.

पाकिस्तान, सौदी, थायलंडमध्येही एकनाथ शिंदेंच्या चर्चा
महाराष्ट्रातील राजकीय गरमागरमीची चर्चा ही केवळ राज्यात देशातच नाही तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. 33 देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्वाधिक सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे हाते. शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानात 54 टक्के, सौदी अरेबियात 57 टक्के, मलेशिया 61 टक्के, नेपाळ 51 टक्के, बांगलादेश 42 टक्के, थायलंड 54 टक्के, जपान 59 टक्के, कॅनडात 55 टक्के लोकांनी सर्च केले. दरम्यान भारतात एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे? याबाबत देखील खूप जास्त प्रमाणात सर्च केलं जात आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:24 PM 27-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here