सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन ? शिवसेना म्हणते, भूलथापांना बळी पडू नका..

0

मुंबई : राजकीय भूकंपात अजून एक मोठा हादरा एका बातमीने दिलाय, ती बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या 21 जून रोजी चर्चा झाली होती अशी बातमी.

खरं तर ही साधारण बातमी नसून राजकीय भूकंपच आहे ज्याचे हादरे बसायला आता सुरुवात झालीये. बातमी हाती येताच एकच गोंधळ उडाला आणि यावर स्पष्टीकरण येऊ लागलं. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत असं स्पष्टीकरण शिवसेना जनसंप्रर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी दिलंय. “उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये” असं वक्तव्य हर्षल प्रधान यांनी केलंय.

19 जूनला विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्याचदिवशी निकाल समोर आला. पण या सगळ्या रणधुमाळीत शिवसेनेत मात्र वेगळ्याच गोष्टी घडत होत्या काही समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. 20 जूनला सकाळी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आलं आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अश्यात हे सगळं उद्धव ठाकरे यांनीच घडवून आणलंय. त्यांनीच शिंदेंना हे बंड करण्यास सांगितलं असल्याचं बोललं गेलं. आणि त्याला दुजोरा देणारी बातमी आता आली आहे. याच्या दुसऱ्या दिवशी 21 जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून बातचित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु शिवसेना जनसंप्रर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी ही बातमी साफ खोटं असल्याचं सांगितलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:13 PM 28-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here