मेजर टेप न दिल्याच्या रागातून घराचा दरवाजा तोडून तिघांकडून महिलेला मारहाण

0

रत्नागिरी : मेजर टेप दिली नाही म्हणून घराचा दरवाजा तोडून घरात घुसून तिघांनी महिलेला मारहाण केल्याची घटना शहरातील कोकणनगर सिध्दीविनायक चौक येथे घडली. याबाबतची फिर्याद फिरोज रफिक सुभेदार (47, कोकणनगर) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली. शफिउल्ला समीर सोलकर, शेहनाज समीर सोलकर, साहिल समीर सोलकर (सर्व रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज यांच्या आई घरी असताना मेजर टेप दिली नाही याचा राग धरुन घराच्या पुढील दरवाजावर लाथ मारुन कडी तोडून घरात प्रवेश केला. शिवीगाळी करत धकलाबुकल करुन मारहाण केली. तसेच घरातील कॉम्प्युटर मॉनिटर घराबाहेर फेकून दिला.

याबाबतची फिर्याद फिरोज सुभेदार यांनी पोलीस स्थानकात दाखल केल्यानंतर संशयित तिघांविरोधात भादविकलम 451, 323, 504, 506, 427, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक करळकर करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 28-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here