ओडिशा : देशात कोरोना विषाणूची दहशत वाढत आहे. अशातच ओडिशा विधानसभेच्या कर्मचाऱ्यालाचं कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर ओडीसा राज्यात संपूर्ण विधानसभेच्या सदस्यांना आणि कर्मचाऱ्यांना क्वारनटाईन करण्यात आलं आहे. वास्तविक, गुरुवारी रात्री उशिरा कोरोनाचा तिसरा रुग्ण ओडिशामध्ये नोंदवला गेला. तो रुग्ण विधानसभेत काम करणारा होता. हा रुग्ण विधानसभेत कार्यरत असताना अनेक व्यक्तींंच्या संपर्कात आला होता. त्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांना क्वारनटाईन करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष सूर्यनारायण पात्रो यांनी सांगितले की, विधानसभा कर्मचार्यांच्या संपर्काची बातमी समोर आल्यानंतर सर्व कर्मचार्यांना सांगून संपूर्ण विधानसभेत स्वच्छतेची व्यवस्था केली गेली आहे. आता प्रत्येकजण 14 दिवस क्वारंटाईनमध्ये मुक्काम करेल. या वेळी जर त्यांच्यात कोरोना घटक आढळले नाहीत किंवा त्याचा अहवाल नकारात्मक असेल तर त्यांना घरी पाठवले जाईल.
