चंद्रकांत पाटील यांनी घेतला स्वतःची पूर्ण सुरक्षा परत करण्याचा निर्णय

0

”कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, देशात संचारबंदी लागू आहे. याचा पोलीस प्रशासनावर ताण पडत आहे. याचा विचार करून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मी माझी पूर्ण सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले पोलीस संरक्षण परत करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकार या परिस्थितीचा सामना करण्यासाठी युध्द पातळीवर काम करत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर आणि पोलिसांवर मोठा भार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पोलीस संरक्षण परत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात नुकतेच मोफत मास्क आणि सॅनिटायरचे वाटप केले. जगभरामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना देशामध्येही करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. चीन, इटली, इराण, अमेरिकासारख्या महासत्ता असलेल्या देशांमध्येही गंभीर पारीस्थिती निर्माण झाली आहे. या महासत्ता देशांनीदेखील कोरोना पुढे हार मानली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातही कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसण्याचे आवाहन मोदींनी केलं आहे. करोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसाच्या लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केलं होतं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:00 PM 27-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here