आयपीएल झाली नाही तर मी कंगाल होईन – ऍरॉन फिंच

0

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वेगाने पसरत आहे. ज्याचा फटका जगातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच बसत आहे. या व्हायरसमुळे जगातील अनेक देशांतील लोक घराबाहेर पडत नाहीत. तसेच जवळपास सर्वच देशांच्या आर्थिक स्थितीवरही याचा परिणाम होत आहे. जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील खेळाडू आपापल्या घरात वेळ घालवत आहेत. कोरोना व्हायरसमुळे भारतात दरवर्षी आयोजित केली जाणारी सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलही येत्या १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी आयपीएलला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. त्यामुळे आयपीएलमध्ये समावेश असणाऱ्या सर्व खेळाडूंना वाटते की आयपीएलचे आयोजन झाले पाहिजे. आयपीएल लिलावादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू कर्णधार ऍरॉन फिंचने आपले याबद्द्लचे मत मांडले आहे. तो म्हणाला की, जर आयपीएल आणि ऑस्ट्रेलियातील देशांतर्गंत सामन्यांचे आयोजन झाले नाही तर तो कंगाल होईल. यावेळी फिंच म्हणाला की, “क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्या खेळाडूंना आयपीएलसाठी देण्यात आलेल्या एनओसीचा आढावा घेईल. तसेच आता सरकारनेही प्रवासावर बंदी घातली आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये भाग घेणे कठीण होऊ शकते.”

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here