Breaking : कुख्यात गुंड साहिल काळेसकर अमरावती कारागृहातून पळाला

0

◼️ अमरावती मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री थरार

◼️ 3 कैदी जेलच्या भिंतीवरून उड्या मारून पळाले

➡️ अमरावती : अमरावती मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री थरारक घडना घडली. अमरावतीचे मध्यवर्ती कारागृह बंदिस्त आहे. या कारागृहातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन कैदी पळून गेले. विशेष म्हणजे कारागृहाच्या भिंतीवरून त्यांनी उड्या मारल्या. त्यामुळं कारागृहातील सुरक्षा व्यवस्था काय करत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन कैद्यांनी कारागृह पोलिसांनी गुंगारा दिला. पसार झालेल्या कैद्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजनाघाटमधील दोन कैदी तर जन्मठेपीची शिक्षा भोगणारा रत्नागिरी जिल्ह्यातील साहिल काळसेकर हा एक कैदी आहे. याआधी, तीन वेळा साहील काळसेकर पोलिसांच्या तावडीतून पळालाय. एकूण २८ गुन्हे गंभीर गुन्हे साहील काळसेकरवर दाखल असून त्यामध्ये खून, दरोडे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

साहिलने न्यायालयातही न्यायाधीशांवरही सुनावणीवेळी चप्पल फेकली होती. तसचं अनेक लोकांवर हल्ला केल्याचे गुन्हे त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.सकाळी तीन कैदी पळून गेल्याची माहिती कारागृह पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पसार आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. रोशन गंगाराम उईके, सुमित शिवराम धुर्वे तर जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला साहिल काळसेकर असे पसार झालेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

◼️ मध्यरात्री नेमकं काय घडलं
सर्व कैदी झोपेत होते. अशावेळी या तिघांनी पळून जाण्याचा प्लॅन आखला. याचा भनक दुसऱ्या कैदांना लागू दिली नाही. शिवाय कारागृह पोलिसांनाही काही कळलं नाही. रोशन उईके, सुमित धुर्वे व साहिल काळसेकर अशी या तीन कैद्यांची नावं आहेत. मध्यरात्री सर्व झोपलेले असताना हे सुरक्षा भिंतीजवळ आले. तिथून त्यांनी सुरक्षा भिंत ओलांडली. त्यानंतर पळून गेले. एवढी मोठी सुरक्षा भिंत असताना ती त्यांनी कशी ओलांडली असेल, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

◼️ आरोपींमध्ये एक जन्मठेपेचा कैदी
तीनपैकी एक आरोपी हा जन्मपेठेचा आहे. तर दुसरे दोन आरोपी आहेत. मध्यरात्री पळून गेल्यामुळं कारागृह पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दोन आरोपी हे अमरावती जिल्ह्यातले आहेत. तर एक आरोपी हा रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. आता आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न कारागृह पोलीस करत आहेत. कैदी पळून गेले याचा अर्थ काही दिवसांपासून त्यांनी प्लॅन आखला असले, याची माहिती कारागृह पोलिसांना कळू शकली नाही. विशेष म्हणजे त्यांनी सुरक्षा भिंत क्रॉस केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 29-06-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here