संक्रमणाच्या धोक्यामुळे रत्नागिरी आठवडा बाजारात सांगली वरून आलेल्या भाजीविक्रेत्यांना नागरिकांनी केला अटकाव

0

रत्नागिरी : जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला शासनाने परवानगी दिली असल्याने सांगली वरून काही व्यापारी भाजी विक्रीसाठी आज रत्नागिरीत दाखल झाले. आजच्या घडीला सांगली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या देखील मोठी. रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. अशावेळी घाटावरून आलेल्या भाजी व्यापाऱ्यांपासून कोरोना संक्रमणाचा धोका नाही का ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या व्यापाऱ्यांना सध्या भाजीविक्री करण्यास नागरिकांनी अटकाव केला असून जिल्हा प्रशासन याबाबत नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:49 AM 28/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here