सेबीच्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत भालावली कॉलेजचे यश

0

रत्नागिरी : सेबीच्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत भालावली (ता. राजापूर) येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र मिळविले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेबी म्हणजेच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ आणि आर्थिक व्यवहार विभाग आणि वित्त मंत्रालयाच्या विद्यमाने प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये भालावली महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील संकेत लाड, विशाखा पारकर, प्राजक्ता पेटावे, द्वितीय वर्ष कला शाखेतील सोनिया जुवळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना सेबीकडून प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी अर्थशास्त्र प्रमुख प्रा. सानिका सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य चंद्रशेखर नामजोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here