रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीला मुकणार?

0

बायो बबलचे कवच हटवल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडूंना कोरोनाचा विसर पडलेला दिसला. रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक खेळाडू लंडनच्या रस्त्यांवर भटकंती करताना दिसले.

त्याचा फटका टीम इंडियाला बसला अन् कर्णधार रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना ताकिद दिली, परंतु बर्मिंगहॅम येथे पोहोचल्यानंतर विराट, रिषभ पंत, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आदी खेळाडू एका रेस्टॉरंटमध्ये दिसले. रोहित क्वांरटाईनमधून बाहेर पडला असला तरी तो पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता मावळली आहे. भारतासाठी हा खूप मोठा धक्का आहे.

1 जुलैपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीत रोहित खेळणार नसल्याची चिन्हे आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत संघाचे नेतृत्व करणार असल्याचे बीसीसीआयने एका वेबसाईटला सांगितले. संघाच्या बैठकीत बुमराहला त्याच्यावरील जबाबदारीची कल्पना देण्यात आली. लोकेश राहुलने दुखापतीमुळे या मालिकेतून आधीच माघार घेतली होती. त्यात रोहितच्या अनुपस्थितीत शुमबन गिलसोबत सलामीला कोण येणार याची उत्सुकता लागली आहे. जर बुमराहने इंग्लंड कसोटीत नेतृत्व सांभाळले तर 35 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटीत कर्णधारपद भूषविणारा तो कपिल देव यांच्यानंतर पहिलाच जलदगती गोलंदाज ठरणार आहे.

भारतीय संघाने आज बर्मिंगहॅम येथे सरावाला सुरूवात केली, परंतु त्यात रोहित शर्माची अनुपस्थिती टीम इंडियाच्या चिंतेत भर टाकणारी ठरली.

रोहितला बॅक अप म्हणून मयांक अग्रवाल लंडनमध्ये दाखल झाला आहे. गिलसह तो सलामीला येण्याची शक्यता वर्तवरण्यात येत आहे. श्रीकर भरतलाही पदार्पणाची संधी मिळू शकते. सराव सामन्यात श्रीकरने दमदार कामगिरी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:49 PM 29-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here