‘अशा’ डॉक्टरांचे शासनाने परवाने रद्द करावेत

0

मुंबई : दवाखाने बंद ठेवून नागरिकांची गैरसोय करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची कडक कारवाई महापालिका प्रशासनाने करावी, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले आहेत. तसेच झोपडपट्टी परिसरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात टाकावे, असेही आदेश दिले आहेत. अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीपोटी त्यांचे खासगी दवाखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे सामान्य, गरीब नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. डॉक्टरांना पालिकेने नोटीस देऊन त्यांचे दवाखाने सुरू करण्याचे आदेश द्यावे. मात्र नोटीस दिल्यानंतरही जे डॉक्टर दवाखाने सुरु करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील खासगी डॉक्टरांना केलं होतं.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:18 AM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here