पावस येथे अमली पदार्थ जनजागृती मोहीम

0

पावस : पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने अमली पदार्थ जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या पोलिस ठाणे अंतर्गत शिवार आंबेरे, पावस रिक्षा स्टॅण्ड, परशुराम मंदिर आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलिस अंमलदार सावंत यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याने शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात. याची माहिती देऊन अमली पदार्थांची गप्त पद्धतीने होणारी विक्री यावर आळा घालुन त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहभाग घेऊन या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि चांगला समाज घडवावे, असे सांगितले.

यावेळी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सर्व अंमलदार उपस्थित होते. त्यानंतर पावस येथील आनंदी अनुसया महिला वृद्धाश्रमामध्ये भेट देऊन तेथील वृद्ध महिलांना खाऊ वाटप केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 30-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here