जिल्ह्यात समुद्रमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष गस्ती अभियान सुरू

0

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्यानंतर घरी परतण्यासाठी चाकरमानी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. गेल्या दोन दिवसात मच्छीमारी नौकांवरुन प्रवासी गावी आले. समुद्र मार्गे येणाऱ्यांना रोखण्यासाठी आता समुद्रगस्त सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार फिनोलेक्स कंपनीने समुद्र गस्तीसाठी खास टगबोट उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरीचे एन. व्ही. भादुले, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जे. डी. सावंत, सहायक बंदर निरीक्षक सुहास गुरव यांच्यासोबत मुंबईहून रत्नागिरीमध्ये समुद्रमार्गे होणाऱ्या अवैद्य प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष गस्ती अभियान सुरू करण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:08 AM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here