‘हमारे झमेलेमे तुम्हारा क्या काम है?’; राज ठाकरेंच्या पोस्टनंतर शिवसेनेकडून प्रत्युत्तर

0

मुंबई : विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याला अवघे काही तास उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

त्यामुळे आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासोबत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नवे उपमुख्यमंत्री असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात घडलेल्या या घडामोडींवर पहिल्यांदाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होता, असं राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या या पोस्टनंतर आता शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना सवाल विचारणारं ट्विट केलं आहे. ‘काही लोक आपल्या दुर्भाग्याला आपलं कर्तृत्व मानतात आणि मग ते 13 आमदारांवरून एका आमदारावर येतात. त्यानंतर ते सौभाग्याचा अर्थ इतरांना शिकवतात. हमारे झमेलेमे तुम्हारा क्या काम है?, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:56 PM 30-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here