पाकिस्तानात पोलिओ डोस देण्यासाठी गेलेल्या टीमवर गोळीबार, तिघांचा मृत्यू

0
A health worker gives the oral polio vaccine to a child in Karachi, Pakistan.

पाकिस्तानात पोलिओ डोस देण्यासाठी गेलेल्या टीमवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तान जिल्ह्यात मंगळवारी हा हल्ला करण्यात आला. हा परिसर अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. बंदूकधाऱ्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन पोलीस आणि एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हे लोक मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी गेले होते.

अफगाणिस्तानला लागून असलेल्या या जिल्ह्यात यावर्षी पोलिओचे 9 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर लसीकरण मोहिमेच्या संदर्भात एक टीम घरोघरी फिरत होती. त्यानंतर बंदुकधारींनी त्यांच्यावर हल्ला केला. ज्यात या टीममधील एक सदस्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले दोन पोलिस ठार झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

यापूर्वीही पोलिओ टीमवर झाले हल्ले

या वर्षी मार्चमध्ये वायव्य पाकिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांनी एका महिला पोलिओ कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली होती. पोलिओविरोधी मोहिमेत भाग घेऊन ती घरी परतत होती. तसेच गेल्या वर्षी जानेवारीमध्ये वायव्य पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण कर्मचार्‍यांच्या पथकाचे रक्षण करणार्‍या पोलिस अधिकाऱ्याची बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे जगातील एकमेव देश आहेत. जिथे पोलिओची प्रकरण आढळत आहेत. यावर्षी अफगाणिस्तान लगतच्या जिल्ह्यांमध्ये पोलिओचे 9 रुग्ण आढळले आहेत, त्याविरोधात लसीकरण मोहीम सुरू असून लसीकरण पथक घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:00 PM 30-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here