एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

0

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो, असं म्हणत शिंदेंनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपातील इतर नेते उपस्थित होते. तसेच, या शपथविधी समारंभाला एकनाथ शिंदेंच्या कुटुंबानेही हजेरी लावली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
8:04 PM 30-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here