निवळी येथील काजू दुकानातून काजू चोरणाऱ्या तिघांना अटक

0

रत्नागिरी : रत्नगिरी ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा गुन्हा रजि. नं. ९२/२०२२ भादविसंक ४५४, ४५७, ३८० व रजि. नं. १४७/२०२२ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० या दोन्ही गुन्ह्यामध्ये निवळी येथील दळवी कॅशू या दुकानातून दोन्ही चोरीच्या वेळी अनुक्रमे २,२०,०००/- व १,९०,०००/- रुपये इतक्या किंमतीच्या काजू बिया चोरीस गेलेल्या होत्या. दोन महिन्याचे अंतरामध्ये एकाच ठिकाणी दोन वेळा चोरी झालेली असल्याने मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग साो. व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सदाशिव वाघमारे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याकडील दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्यात येत होता.

दिनांक २९/०६/२०२२ रोजी २३.०० वा. रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाण्याचे स.पो.नि.सूर्य व स्टाफ असे शासकिय वाहनाने गोळप परिसरात पेट्रोलिंग साठी फिरत असताना रस्त्याच्या कडेला एक ह्युंदाई एसेंट कार क्र.एम.एच.०९/एफएल/४१७६ ही संशयितरित्या उभी असल्याचे दिसल्याने सदर कारजवळ जावुन त्यातील बसलेल्या इसमांकडे चौकशी करण्याकरीत जात असताना वरील कारचालक वेगाने पावसच्या दिशेने भरधाव वेगाने निघुन गेले. तेथुनच पोलीसांचा व संशयीत कारचा थरारक पाठलाग सुरु झाला. कार पुर्णगडचे दिशेने जात असल्याने तसे पुर्णगड पोलीसांना कळवुन त्यांचे मार्फत मदत प्राप्त करुन संशयीत कार पावस फाटा येथे थांबविण्यात आली.

सदर कारची खात्री करता त्यामध्ये तीन संशयीत इसम आढळुन आले. तसेच कारमध्ये काजुचे पोते आढळुन आले. मात्र सदरचे काजुबियांबाबत खात्रीशिर कोणतीही माहीती त्यांनी दिली नाही. त्यामुळे त्यांचेकडे अधिक चौकशी करता सदरची काजू या निवळी येथील घरफोडी चोरी करुन आणल्याचे सांगीतले. तसेच त्यांच्या वरील कारची झडती घेता त्यामध्ये घरफोडी करीता वापरण्यात आलेली हत्यारे तसेच २१,०००/- रुपयेची रोख रक्कम तसेच पानटपरीतील सिगारेट पाकिटे, बिडी बंडल वगैरे साहित्य मिळुन आले.

सदर रोख रक्कम रुपये २१,०००/- बाबत चौकशी करता रोख रक्कम ही त्यांनी श्री गजानन महाराज मंदीर गोळप सडा येथील मंदीरातील दानपेटी फोडून चोरली असल्याचे सांगीतले. पान टपरीतील साहित्याबाबत त्यांनी ते चिपळूण खेर्डी येथील एमआयडीसीकडे जाणारे रोड लगतची टपरी फोडून चोरुन आणल्याची कबूली दिली. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता मागील सुमारे तीन महिन्यांपूर्वी निवळी येथील दळवी कॅशू येथील चोरी करुन सुमारे २,२०,०००/- रुपये किंमतीच्या काजू बिया चोरुन नेल्याबाबत सदर इसमांनी कबूली दिली आहे.

म्हणुन कारमधील इसम (१) रज्जाक असलम मुजावर, वय २३, रा.नांग्रे सांगली बायपास पलूस रोड, इनाम पट्टी ता.मिरज जि.सांगली (२) साहिल इसाक सायनावाले, वय २२, रा.करासवाडा म्हापसा, बार्देश नॉर्थ गोवा, (३) अक्षय संतोष पाटील, वय २४, रा. देवकांडगाव ता. आजरा जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेवून रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली झुंदाई कार क्र.एम.एच.०९/एफएल/४१७६, गुन्ह्याकरीता वापरण्यात आलेली हत्यारे व गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकुण ८,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल त्यांचेकडुन जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग सो, व उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली मा. स.पो.नि./दिनकर सुर्य, स.पो.नि./जाधव पुर्णगड पोलीस ठाणे, स.पो.नि./दत्ता शेळके, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार सपोफौ/ शिवाजी इंदुलकर, सपोफौ/ सतीश साळवी (चालक), पोहवा/१०४ उदय वाजे, पोना/१२२८ वैभव मोरे तसेच पुर्णगड पोलीस ठाणेचे पोहवा/२८५ ललीत देवुसकर, पोहवा/ १२४९ योगेश भातडे (चालक) यांनी बजावली आहे. वरील टिमला मा. पोलीस अधीक्षक यांचेकडुन गौरविण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
8:12 PM 30-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here