करोना पार्श्वभूमीवर एच.पी. गॅस कंपनीची ग्राहकांसाठी नियमावली

0

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर एच.पी. गॅस कंपनीने आपल्या ग्राहकांना काही नियमावली घालून दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गरज नसताना गॅस नोंदणी करू नये. रिफील नोंदणीसाठी मोबाईल, व्हॉटस् अॅप मॅसेज फोनद्वारे, एच. पी. अॅप याद्वारेच नोंदी करावी. गॅसबाबत काही अडचण, गॅस गळती किंवा इतर शंका असल्यास गॅस वितरकांच्या कार्यालयाशी फोनवरून संपर्क साधावा. गॅस सबसिडी संदर्भात शंका किंवा अडचण असल्यास जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत गॅस कार्यालय किंवा बँकेत जाऊन गर्दी करू नये. गॅस गळतीसाठी १९०६ फोन नंबर २४ तास उपलब्ध आहे. वितरण प्रणालीमध्ये सिलिंडर घरपोच करणारे वितरक महत्त्वाचे घटक आहेत. शक्यतो घराच्या बाहेरच सिलिंडर स्वीकारा. या सर्व गोष्टी ग्राहकांनी कराव्यात, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा एच. पी. गॅस डिलर्स असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:13 AM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here