…म्हणून आधी जाहीर केलेलं अधिवेशन पुढं ढकललं; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

0

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवनियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. मात्र या अधिवेशनाची तारीख आता बदलण्यात आली आहे. हे अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते ते आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. यावरुन काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन जे 2 आणि 3 जुलै रोजी होणार होते. ते केवळ हैदराबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने पुढे ढकलण्यात आले आहे. भाजपने स्वतःला सर्वशक्तिमान आणि संविधानापेक्षा अधिक शक्तिशाली समजण्यास सुरुवात केल्याचे हे लक्षण आहे, असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:34 PM 01-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here