रत्नागिरी : पत्र, पार्सल यातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी डाक विभागाची सेवा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील डाक सेवा मंगळवार व बुधवारी बंद होती. परंतु आता पुन्हा या निर्णयात बदल करण्यात आला असून डाक सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय डाक विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका आता अनेकांना बसण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष वस्तू हाताळण्याचे आणि त्याचे स्थलांतर करण्याचे प्रमाण डाक विभागात अधिक आहे. यामुळे, कोरोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, रत्नागिरी शहरातील सध्याची कोरोनाबाबतची वस्तुस्थिती विचारात घेता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी काही दिवस कार्यालये पुन्हा बंद ठेवण्यात यावीत, अशीही मागणी होत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:46 AM 28-Mar-20
