किम जोंग यानी कोरोनासाठी एलियन्सला धरलं जबाबदार

0

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपले विचित्र निर्णय आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो.

शुक्रवारीही किम जोंग उनने कोरोना व्हायरसबाबत असा दावा केलाय जो ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल. देशातील पहिलं कोरोना प्रकरण एलियनद्वारे पसरलं आहे असं म्हटलं. उत्तर कोरियाने आपल्या दाव्यात म्हटलं आहे की, एलियन्सने हा व्हायरस दक्षिण कोरियाच्या सीमेजवळून फुग्यांमध्ये टाकला होता. त्यामुळे त्यांच्या देशात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, किम जोंगने म्हटलं की, तपासणीनंतर असं आढळून आले आहे की फुग्यांमध्ये व्हायरस भरून एलियन्सने दक्षिण कोरियाच्या सीमेजवळून त्यांच्या देशात कोरोना व्हायरस पसरवला आहे. त्याच वेळी उत्तर कोरियाने ‘सीमा रेषा आणि सीमेवरील भागांना वारा आणि इतर हवामानातील घटना आणि फुग्यांमधून येणार्‍या परदेशी वस्तूंशी व्यवहार करताना सावध राहण्याचे’ आदेश दिले आहेत.

उत्तर कोरियाची सरकारी मीडिया KCNA नुसार, उत्तर कोरियाने म्हटले आहे की, ‘एप्रिलच्या सुरुवातीला कुमगांगच्या पूर्व काऊंटीमध्ये 18 वर्षीय सैनिक आणि एक पाच वर्षांचा किंडरगार्टनर निवासी क्वार्टरच्या आसपास अज्ञात सामग्रीच्या संपर्कात आले. त्यानंतरच त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर संपूर्ण देशात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, “तपासाच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की एप्रिलच्या मध्यात कांगवोन प्रांतातील कुमगांग काउंटीमधील इफो-री भागातून राजधानी शहरात आलेल्या अनेकांना तापाची लागण झाली होती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये देखील तापाची प्रकरणे वाढत आहेत.” एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:32 PM 01-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here