गोविंदगडावर एक हजार रोपांची लागवड

0

चिपळूण : चिपळूणमधील गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर श्री देवी करंजेश्वरी आणि श्री देव सोमेश्वर देवस्थानतर्फे एक हजारहून अधिक वृक्ष आणि आंबा बाठांची लागवड नुकतीच करण्यात आली.

चिपळूण बाजारपेठेपासून तीन किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वाशिष्ठी नदीकाठावर वसलेल्या गोविंदगडाला छत्रपती राजाराम महाराजांनी भेट दिली आहे. या गोविंदगडावर आजही तटबंदी बुरूज, हौद, तोफा असा ऐतिहासिक ठेवा जपला जात आहे. या गडाच्या पायथ्याशी श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानचे मंदिर असून या देवस्थानतर्फे गोविंदगडाचे सुशोभीकरण आणि पर्यटनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या गडावर वृक्षरोपण मोहिम राबविण्यात आली. गोविंदगडाच्या सभोवती व अंतर्गत भागात खड्डे खोदून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

एकाचवेळी एक हजारहून अधिक वृक्ष व फणस, आंबा झाडांची लागवड करण्याचा संकल्प देवस्थानने सोडला होता. तो पूर्ण झाला. गोवळकोट ग्रामस्थही या मोहिमेत सहभागी झाले. अन्य पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी या उपक्रमाला सक्रिय सहकार्य केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here