स्वामी स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेव वृद्धी मासात पहिल्या 10 दिवसात 4 कोटी 58 लाखांच्या नवीन ठेवी संकलित : ॲड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पत संस्थेचा ठेव वृद्धी मास सुरू असून या ठेव वृद्धीमासाला भरभरून प्रतिसाद प्राप्त होत आहे. संस्थेच्या सर्व शाखा कार्यालयात मोठ्याप्रमाणावर ठेवीदार गुंतवणूक करीत आहेत पहिल्या 10 दिवसात 4 कोटी 58 लाखांच्या ठेवी नव्याने गुंतवल्या गेल्या आहेत.

संस्थेकडील एकूण ठेवी 256 कोटी 31 लाख झाल्या आहेत. प्रतीवर्षी ठेव वृद्धी मासात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार संस्थेच्या विश्वासार्ह ठेव योजनांत ठेव गुंतवत असतात संस्थेची विश्वासार्हता अधोरेखित करणारा हा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे. ठेवीदार आणि विश्वासार्ह स्वरूपानंद पत संस्था हे ऋणानुबंध प्रतिवर्षी अधिक दृढ होत आहेत संस्थेच्या ठेवीदारांनची संख्या 21 हजार पेक्षा अधिक झाली आहे. जनमानसात सर्वदूर स्वरूपानंद संस्था सर्वमान्य झाली असल्याचे हे द्योतक आहे, असे भावोद्गार अँड. दीपक पटवर्धन यांनी काढले व संस्थेच्या सुरक्षित व विश्वासार्ह अर्थकारणाचा लाभ घेण्यासाठी ठेवीदारांनी स्वरूपानंद च्या ठेव योजना मध्ये गुंतवणूक करावी असे विनम्र आवाहन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 02-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here