रत्नागिरी : जिल्ह्यात मागील दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साचलेले पाणी, पाण्यात बुडालेले पूल आणि रस्ते, रस्त्यांवर कोसळलेल्या दरडी याचा फटका एसटी सेवेला बसला असून, दोन दिवसांत एसटीच्या १७०० फे-या रद्द करण्यात आल्या. यामुळे एसटीचे २७ लाखांचे उत्पन्न घटले आहे. चिपळूण आणि देवरूख आगारांतून सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत एकही फेरी सोडण्यात आली नाही. जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला, त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने या मार्गावरील सर्वच रहदारी ठप्प झाली होती, सोमवारी चिपळूण आणि देवरुख आगारातून दुपारी दोन वाजेपर्यंत एकही गाडी सुटली नाही. रत्नागिरी आगारातूनही रत्नागिरी-चिपळूण, रत्नागिरी-देवरूख आणि रत्नागिरी कोल्हापूर या मार्गावरील एसटी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. फणसोप – मागलाड मार्गही पावसामुळे प्रभावित झाल्याने कोळंबे येथे जाणा-या गाड्या जुईवाडी मार्गे धावत होत्या. ग्रामीण भागात हर्चे आणि त्यापुढे जाणाच्या मार्गावरील गाड्या मावळंगेपर्यंतच जात होत्या. वरवड़ेकडे जाणाच्या गाड्या कोतवडेपर्यंत जात होत्या. चांदेराई शहरी वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला. हातिस आणि सोमेश्वर येथे पाणी भरल्याने या गाड्या बंद ठेवण्यात आल्या. एसटीचे २७ लाखांचे बुडाले उत्पन्न : जिल्ह्या रविवारी एसटीच्या ५७२ फेच्या रद्द करण्यात आल्या. एकूण ३७ हजार ३७० किमी वाहतूक बंद होती. यातून ८ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत एसटीच्या ११२८ फे-या रद्द करण्यात आल्या. एकूण ८२ हजार ३२८ किमी अंतराची वाहतूक बंद ठेवण्यात आली. यामुळे एसटीचे १८ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. दोन दिवसात एसटीचे २७ लाख२० हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले.
