शिवभोजानाची संख्या वाढवण्यात येणार असून कोणीही उपाशी झोपणार याची खबरदारी सरकार घेणार

0

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज आपल्या फेसबुक लाईवद्वारे जनतेशी संवाद साधला. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असून सर्वांनी एकत्र येऊन संकटाला समोर जाऊ. घरात बसा, बाहेर जाण टाळा आणि सुरक्षित राहा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. तसेच राज्यात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत राहणार आहे. नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. झुंबड केल्याने संसर्ग होण्याची शक्यता आहे. करोनाच्या भीतीने अनेक मजूर पलायन करत आहेत. अशा मजुरांना आहे तिथेच अत्यावश्यक सुविधा पुरवण्याचे काम सरकार करत आहे. शिवभोजानाची संख्या वाढवण्यात येणार असून कोणीही उपाशी झोपणार याची खबरदारी सरकार घेणार आहे, असेही पाटील म्हणाले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:48 PM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here