कृषीदिनानिमित्त मयेकर महाविद्यालयात भिंतीपत्रकातून घडविले कोकणी पिकांचे दर्शन

0

जाकादेवी/वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे ‘पर्यावरण विभागा’ तर्फे कृषीदिनानिमित्त कोकणी पिकांचे दर्शन भिंतीपत्रकातून प्रदर्शित करण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून कोंकणातील विविध पिकांचे चित्रण भिंतीपत्रकावर अधोरेखित केले. युवा नेते व शिक्षण संस्थेचे सचिव श्री रोहित मयेकर यांच्या उपस्थित संस्थेचे हितचिंतक व ओरी गावचे उपसरपंच व युवा कार्यकर्ते श्री. संकेत देसाई यांच्या हस्ते या भिंतीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले.

प्राचार्य स्नेहा पालये आणि प्रा. शामल करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. रोहित मयेकर संस्थेचे संचालक श्री. सुरेंद्र माचिवले,ओरी गावचे उपसरपंच श्री. संकेत देसाई यांसह महाविद्यालयाचे प्र. प्राचार्या स्नेहा पालये, प्रा. गणेश कुलकर्णी, प्रा. अवनी नागले, प्रा. कविता जाधव, प्रा. शामल करंडे, प्रा. गुरूनाथ सुर्वे, प्रा. तेजश्री रेवाळे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here