‘त्यांचा’ मी बदला घेणार, फडणवीसांचा हल्लाबोल

0

मुंबई : एकनाथ शिंदे हे सेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यावर ज्या सदस्यांनी विश्वास टाकला त्यांचे आभार मानतो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

तसेच ज्या सदस्यांनी प्रस्ताव बहुमतानं पारीत व्हावा यासाठी अप्रत्यक्षपणे सभागृहाच्या बाहेर राहून सहकार्य केलं, त्या अदृश्य ‘हातांचे’ मी आभार मानत असल्याचा टोला देखील फडणवीस यांनी केलं. एक

नाथ शिंदे हे 24 बाय 7 काम करणारा नेता आहे. शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता असल्याचे म्हणत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ज्यांनी माझी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:18 PM 04-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here