कर्जमाफी योजनेला मुदतवाढ मिळावी; राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0

कोरोनाचा प्रादुर्भाभावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक गोष्टीच्या खरेदीव्यतिरिक कोणालाही घराबाहेर पडण्याची मुभा नाही. अशातच दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची, तसेच पंजाबराव देशमुख व्याजमाफी योजनेची मुदत 30 जूनपर्यंत वाढवावी, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, या योजनेच्या लाभाबाबत शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधत, योग्य तो निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. कर्जमाफी योजनेची मुदत 30 मार्च 2020पर्यंत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:08 PM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here