लॉकडाऊनमुळे रस्त्यामध्ये अडकलेल्यांची व्यवस्था करावी – सोनिया गांधी

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनवरून मोदी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या लोकांना सरकारने सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक लोक रस्त्यात अडकून पडले आहेत. त्यांना घरापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही सरकारची असून त्यासाठी राज्य परिवहन सेवा पुरवण्यात यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:51 PM 28-Mar-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here