निवडणुका होऊ द्यात, शिवसेना १०० हून जास्त जागा जिंकेल : संजय राऊत

0

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. नव्या सरकारला १६४ मते मिळाली, तर विरोधात ९९ मते पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणानंतर शिवसेना नेते आणि खासदार यांनी पलटवार केला आहे.

आता निवडणुका जरी लागल्या, तरी शिवसेनेला १०० हून जास्त जागा मिळतील, असा दावा करत, आम्ही तयार आहोत, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here