शुकनदीने ओलांडली धोक्याची पातळी

0

सिंधुदुर्ग : सोमवारी पहाटे पासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे असणाऱ्या शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण नदीचे पाणी हळूहळू खारेपाटण मधील काही मुख्य रस्त्यावर येऊ लागले आहे.

यामध्ये खारेपाटण -चिंचवली रोड, खारेपाटण-बंदरवाडीकडे जाणारा घोडेपाथर रोड, तसेच खारेपाटण जैन वस्तीकडे जाणारा रोड, मच्छिमार्केट रोड पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. फक्त खारेपाटण हायवेवरून बॉक्सवेल कडून खाली मुख्य रोड वर पुराचे पाणी अजून आले नसून त्या रोडच्या शेजारी असणाऱ्या शेतामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. रात्रभर जर पावसाने जोर धरला दिवसभर पडणारा हा पाऊस जर असाच मुसळधार कोसळू लागला तर खारेपाटण बाजारपेठेकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर तसेच बाजारपेठेत पाणी भरण्याची ही शक्यता आहे.

या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याशी संपर्क केला असता त्यानी नागरिकांना काळजी घेण्याचे, सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच खारेपाटण नागरिकांना, व्यापारी वर्गाला काही आपत्तकालीन परिस्थिती ओढवली असेल तर लगेचच खारेपाटण ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांशी किंवा सरपंच यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन सरपंच रमाकांत राऊत यांनी केले आहे.

याशिवाय खारेपाटण सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी हे या पूरस्थिती मध्ये आपत्तकालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे ही खारेपाटण सरपंच यांनी सांगितले आहे.तसेच खारेपाटण दुरक्षेत्र येथील पोलीस कर्मचारी ही आपत्तकालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या सेवेसाठी सज्ज असून खारेपाटण पोलीस विभागामार्फत ही खारेपाटणसह शुकनदी किंवा पूरपरिस्थिती ठिकाणी असलेल्या नागरिकांना काळजी घेण्याचे किंवा सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here