◼️ लांजामध्ये सर्वाधिक 342 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील चार नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर गेले आहे. खेड येथील जगबुडी नदी, संगमेश्वर येथील शास्त्री नदी, लांजा येथील काजळी नदी, तर राजापूर येथील कोदवली नदी इशारा पातळीच्या वर वाहत असल्याने या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 157 मिमी तर एकूण 1413 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
मंडणगड 205.00 मिमी
दापोली 145.00 मिमी
खेड 74.00 मिमी
गुहागर 77.00 मिमी
चिपळूण 169.00 मिमी
संगमेश्वर 210.00 मिमी
रत्नागिरी 69.00 मिमी
राजापूर 122.00 मिमी
लांजा 342.00 मिमी.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 05-Jul-22