रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाउस असून अनेक ठिकाणी या पावसामुळे नुकसान झाले आहे. आता या पावसाचा परिणाम डोंगराळ भागात अधिक जाणवू लागला आहे. अतिवृष्टीमुळे विविध भागात पाणी साचण्याचे व रस्ते खचण्याचे प्रकार घडत असतानाच आता आंबा घाटातील मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत. गेल्या काही दिवसात भेगा पडण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर या भेगा वाढत चालल्या असल्याने देवरूख पोलिसांनी आंबा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद केली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
