अमेरिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या परेडवर गोळीबार; 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी

0

अमेरिकेत शिकागो मध्ये 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिनाच्या परेड वर झालेल्या गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू झाला असून 59 लोक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली आहे. या घटनेवर राष्ट्रपती जो बायडन यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान हायलँड पार्कमध्ये गोळीबाराचा आरोपी असलेल्या 22 वर्षीय रॉबर्ट क्रिमोला पोलिसांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर अटक केली.

अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10 वाजता शिकागोमधील इलिनोइस येथील हायलँड पार्कमध्ये परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या परे़डवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोकांचा चांगलाच गोंधळ उडाला. प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे पळत होता. गोळीबारानंतर परेड थांबवत पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि परिसरात अलर्ट जारी करण्यात आला.

या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटलं आहे की, बंदूक हिंसेविरोधातील आमची लढाई सुरुच राहणार आहे. हिंसा संपवण्यासाठी आमचा संघर्ष सुरुच राहील. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘मी आणि माझी पत्नी या हिंसेच्या घटनेनं स्तब्ध झालो आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अमेरिकेच्या नागरिकांना दु:ख पोहोचवण्यात आलं. या बंदूक हिंसेविरोधात आमचा संघर्ष सुरु राहील.’

छतावर लपला होता हल्लेखोर
स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर हल्ला करणारा हल्लेखोर छतावर लपून बसला होता. ‘द हिल’ वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या गोळीबारातील हल्लेखोर अद्याप फरार आहेत. एक आरोपी रॉबर्ट क्रिमो याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here