सत्ता मिळवली पण महाराष्ट्राचे मन जिंकलेले नाही, भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल : ममता बॅनर्जी

0

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवरती देशातील सगळ्या राजकीय नेत्यांचं लक्ष होतं.

महाराष्ट्रातलं बंड गुजरातमध्ये गेलं त्यानंतर ती जागा असुरक्षित असल्याचं लक्षात आल्यानंतर आमदारांना घेऊन
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी गाठली. हे संपुर्ण राजकारण अवघ्या देशाने पाहिलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी बंडखोर आमदारांना पैश्याशिवाय आणखी काय देण्यात आलं असा गौप्यस्फोट ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बेकायदा आहे. त्यांच्या सरकारने सत्ता मिळवली असली तरी महाराष्ट्राचे मन आणि ह्दय त्यांना जिंकता आलेले नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. सत्तेचा दुरूपयोग करून त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. मात्र पुढच्या निवडणुकीत जनताच भाजपसाठी बुलडोझर बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वास
मला विश्वास आहे की हे सरकार अधिक काळ सत्तेत राहणार नाही. हे अनैतिक तसेच लोकशाही मधून तयार झालेले सरकार नाही. सध्या त्यांनी सरकार जिंकले आहे. पण त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले नाही असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीवरती बुलडोज चालवू शकता. पण या देशातील जनता लोकशाही मार्गाने तुमच्यासाठी बुलडोझर बनेल. तसेच ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना “आसाममध्ये भाजपकडून पैसे आणि इतर गोष्टींचा पुरवठा केला असा आरोप केला

भाजप आणि केंद्र सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केली
घराणेशाहीच्या राजकारणाच्या भाजपच्या वारंवार वापरल्या जाणार्‍या टीकेला देखील त्यांनी जोरदार उत्तर दिले. भाजप आणि केंद्र सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर अनेकांचं लक्ष महाराष्ट्रातल्या राजकारणाकडं लागलं होतं. तब्बल दहा सुरू असलेल्या या राजकीय नाट्यात महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालं आणि नवं सरकार आलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:08 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here