लोकराजा राजर्षि शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सुनील डांगे यांना प्रदान

0

रत्नागिरी : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव आविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फौंडेशन (कोल्हापूर) यांच्यामार्फत यंदाचा लोकराजा राजर्षि शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार येथील सुनील सखाराम डांगे यांना प्रदान करण्यात आला.

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिमध्ये श्री. डांगे वरिष्ठ लिपिक आहेत. छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त गौरव पुरस्काराचा वितरण समारंभ इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील समाजवादी प्रबोधिनी येथे झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वक्ते ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे-पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डॉ. सौ. सुमित्रा पाटील, आविष्कार फौंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, निमंत्रक आणि नारी एकता मंच (कोल्हापूर) सौ. सुचेता कलाजे आणि सौ. सरस्वती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. डांगे यांनी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमध्ये १८ वर्षे, शिरगावच्या (कै.) वा. ग. नेने हायस्कूल येथे ६ वर्षे काम केले आहे. गेली १८ वर्षे ते परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात वरिष्ठ लिपिक आहेत. शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापन समिती मंडळावर १५ वर्षे कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव म्हणून १० वर्षे कार्यरत असून शिक्षकांचे प्रश्न सोडविणे, वेळप्रसंगी उपोषण, धरणे आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. श्रीदेवी रांभोळकरीण मंडळ या सामाजिक संस्थेचे ५ वर्षे अध्यक्ष आहेत. या माध्यमातून गरीब मुलांना वह्या, पुस्तकांचे वाटप, महिला सबलीकरण कार्यक्रम, महिलांना मार्गदर्शन आणि उपक्रम राबवतात. हातखंबा डांगेवाडी येथील स्वयंभू जंबुकेश्वर देवस्थान कमिटीचे ते ३० वर्षे अध्यक्षपद भूषवले आहे. या माध्यमातून विधवा महिलांना शिवणयंत्र, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, मुलींना प्रशिक्षणसाठी सहकार्य अशी सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना श्री. डांगे यांनी सांगितले की, हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्याचा आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य पु. वा. फाटक गुरुजींच्या फाटक हायस्कूल आणि परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचा हा बहुमान आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:44 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here