शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध

0

पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही २० जुलै २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र १ जुलैपासून संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:15 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here