गडनदी धरण परिसरातील गावांना सतर्कतेच्या सूचना

0

रत्नागिरी : सतत सुरू असलेल्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण तुडुंब भरले असून नदीकिनारी असलेल्या मुरडुव, आरवली, खेरेशतसह माखजन पट्ट्यातील गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गडनदी धरणाची संचय क्षमता १२१.१५ मीटर असून मंगळवारची पाणी पातळी १२१.३५ मीटर एवढी झाली आहे. क्षमतेपेक्षा २० सेंमी उंचीने पाणी वाहत असून विसर्ग १०.५२ घ.मी. प्रतिसेकंद आहे. सध्या धरणात एकूण ६६.६९९ दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा ६६.३८७ दलघमी आहे. गडनदी धरणातून सोमवारी रात्री ८ वाजता सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली, अशी माहिती गडनदी प्रकल्प कुचांबे उपविभागाचे उपविभागीय अभियंता जी. आय. इनामदार यांनी दिली.

शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये आणि स्वतःसह जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन राजिवलीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी यावेळी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्णपणे भरला असून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 06-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here