जिल्ह्यात कोरोनाचे नवे १८ रुग्ण

0

रत्नागिरी : जिल्ह्यात दि. ५ जुलैला कोरोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत ८४ हजार ९०६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८२ हजार २७९ म्हणजे ९६.९१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी आरटीपीसीआरसाठी ७३ नमुने पाठवले. त्यातील ६८ निगेटिव्ह, तर ५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी १९८ जणांचे नमुने पाठविले होते. त्यापैकी १८५ निगेटिव्ह, तर १३ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ५४ हजार २८५ जणांची कोरोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९१ रुग्णांपैकी लक्षणे नसल्याने ७१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर लक्षणे असलेले १८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दोन रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली आहे.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि ७, तर डीसीएचमध्ये ११ रुग्ण उपचार घेत आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण दाखल नाही. बाधितांपैकी एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण नाही.

जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्युदर २.९९ टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 06-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here