आजीच्या मदतीला पोलीस धावले, दिले एक महिन्याचे रेशन…

0

रत्नागिरी : संचारबंदीच्या काळात २४ तास कार्यरत राहून आपले कर्तव्य बजावणारा पोलीस आज नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नाक्यावर उभा असेलेला दिसून येत आहे. पण इतक्यावरच न थांबता इतर अनेक कामे करून हा पोलीस आता अक्षरशः अनेकांसाठी देवदूत बनला आहे. ‘साहेब आजी गावातील घरात एकटीच आहे, घरातील धान्य देखील संपलय’ असा एक मेसेज अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मोबाईलवर आला. आपलीच आजी समजून पोलीस दल कामाला लागलं. चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील इंदू गणपत मोहिते या आजीला तत्काळ मदत करण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिल्या आणि पोलीस पोहचले सुद्धा. एक महिन्याचे रेशन, मास्क आणि सॅिनटायझर देऊन पोलिसांनी सांगितलं ‘आजी काही गरज लागल्यास आम्हाला फोन करा’
अशा प्रत्येक आजीच्या अथवा गरजुच्या घरापर्यंत पोहोचणं पोलिसांना जरी शक्य नसलं तरी या कठीण प्रसंगी माणुसकी जपण्याचा आदर्श रत्नागिरी पोलीस दलाने या घटनेतून समाजाला दिलाय. या उदाहरणातून प्रत्येकाने बोध घेतल्यास गरजूंना नक्कीच आधार मिळेल.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here