18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार : गुलाबराव पाटील

0

जळगाव : शिवसेनेत बंड केल्यानंतर अनेक आमदार आपल्या घरी काल पहिल्यांदा पोहोचले आहे. महाराष्ट्रात जे काही मागच्या काही दिवसात चाललं आहे. ते महाराष्ट्रासह अवघ्या देशाने पाहिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर हे राजकीय नाट्य संपुष्टात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार आता आपल्या मतदार संघात परतले आहेत. काल रात्री उशिरा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील जळगावात पोहोचले त्यानंतर त्यांचं तिथं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडलं असल्याचं देखील त्यांनी त्यांच्या समर्थकांना बोलून दाखवलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी अजूनही सावध रहावं असा सल्ला देखील त्यांनी ठाकरेंना दिला.

शिंदे सरकार स्थापनेनंतर माजी बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथमच जळगावमध्ये आले. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार व 20 आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र उद्धव ठाकरेंना आम्ही सोडलं नाही उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडलं. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित समर्थकांना सांगितले.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर माजी बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील मंगळवारी रात्री प्रथमच आपल्या पाळधी येथील निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ते आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करा असा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here