रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

0

मुंबई : रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला…. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

सोमवारी विधानसभेत भाजपा शिवसेना युतीने बहुमत चाचणीत 164 मते मिळविल्यानंतर दिवस गाजवला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. त्यांचे भाषण हा या दिवसातील परमोच्चबिंदू होता. एकनाथ शिंदेंच्या भाषण सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले.
काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना…. असा टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता.

त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here