राजापुरातील तरुणांनी बुडणाऱ्या कामगाराला वाचवले

0

राजापूर शहर आणि तालुका परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात अर्जुना नदीपात्रात कोंढेतड पुलानजीक वाहून जाणाऱ्या केसीसी कंपनीचा कामगार किशोर शंभुनाथ खान वय रा. ३० याला राजापूर शहरातील कोंडतड पुलावरून कंबरभर पाण्यातून शहराकडे राजापूरातील धाडसी तरूणांनी आपला जीव धोक्यात घालुन वाचविले आहे. या तरूणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजापूर शहरातील सुरज पेडणेकर, प्रज्योत खडपे आणि शिवा खानविलकर यांनी पुराच्या पाण्यात उडया घेत वाहून जाताना नगर परिषदेच्या पथदिपाच्या पोलाचा आधार घेत जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या या कामगाराला मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले आहे. सोमवारी नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह पाटील यांनी या धाडसी तरूणांचा सत्कार करून कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारली. 
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या केसीसी बिल्डकॉन ठेकेदार कंपनीचा कोंढेतड गाडगीळवाडी  येथे मोठया पुलाचे काम करणाऱ्या कामगार किशोर शंभुनाथ खान .बिहार राजापूर शहरातील कोंडतड पुलावरून कंबरभर पाण्यातून शहराकडे जात येत होता. पुल पार करून तो पलिकडे येत असतानानच त्यााला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुराच्या पाण्यात वाहत गेला. होता. घाबरलेल्या अवस्थेत त्याने या पुराच्या पाण्यात रस्त्यावरिल नगर परिषदेच्या पथदिपाच्या पोलाला घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर घाबरून जाऊन  जीवाच्या आकांताने ओरडत होता.  याबाबत माहिती मिळताच  शहरातील तरूण सुरज पेडणेकर यांनी आपले सहकारी प्रज्योत खडपे, शिवा खानविलकर व काही तरूणांसह घटनास्थळी धाव घेतली. क्षणाचाही विलंब न करता या तरूणांनी पुराच्या पाण्यात उडया घेतल्या व या कामगाराला सुखरूप बाहेर काढाले. स्थानिक नगरसेवक सुभाष बाकाळकर, माजी नगरसेवक दशरथ दुधवडकर यांसह स्थानिकांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात सहभाग घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here