रत्नागिरी : करोनाचा संशयित म्हणून रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात एकही नवा रुग्ण दाखल झालेला नाही. यापूर्वी दाखल झालेल्या पहिल्या आणि एकमेव करोनाबाधित रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. जिल्हा रुग्णालयातून यापूर्वी करोनाच्या तपासणीसाठी पाठविलेल्या सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात घरातच विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या ७३५ झाली आहे. घरातच विलगीकरणासाठी ठेवल्याचा शिक्का मारलेली कोणतीही व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष, जवळचे आरोग्य केंद्र किंवा पोलीस यंत्रणेला आणि ग्रामपातळीवर ग्राम कृती दलांना द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:39 AM 30-Mar-20
